राजूर येथील सर्वांचे लाडके शौकत चाचा सर्वांना कायमचे सोडून गेले

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (८ जुलै) : राजूर कॉलरी येथील रहिवासी असलेले शौकत अली यांचे आज वृद्धपकाळाने राहत्या घरी निधन झाले झाले. मृत्यू समयी ते ९० वर्षाचे होते. चाचा शौकत अली म्हणून ते संपूर्ण परिसरात परिचित होते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक व राजकीय चळवळी राबविल्या. राजूर जामा मस्जिदचे ते अध्यक्ष होते. एक वेगळं व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची समाजात ख्याती होती. शौकत चाचा आता सर्वांना सोडून गेल्याने त्यांना चाहणारा वर्ग दुःखात बुडाला आहे. अशपाक अली या त्यांच्या मुलाकडेच आज पहाटे १.२५ वाजता त्यांचं निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसमुदाय त्यांच्या निवासस्थानी जमा झाला होता. त्यांचा सामाजिक परंपरेनुसार दफनविधी करण्यात आला.