बायोवेस्ट मेडीकल फेकणा-यावरती गुन्हा दाखल करा- मनीष नरवाडे

सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (८ जुलै) : औरंगाबाद पुणे महामार्गावर छावणी परिसरात काही अज्ञात मेडीकल किंवा हाॅस्पीटल धारकाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मेडीकल मधील गोळ्या, औषध, सलाईन अशा विविध प्रकारचे इंजेक्शन या ठिकाणी आणुन टाकले आहेत. हे सर्व वेस्ट मटेरीयल आणि मुदत संपलेल्या गोळ्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणी आणुन टाकले असतील यावर मात्र, प्रश्न चिन्ह आहे.

कोरोनाच्या महामारीने अगोदरच जनता त्रस्त झाली आहे. आरोग्य विभागाने घालुन दिलेल्या नियमांना पायदंळी तुडवत काही मुजोर हाॅस्पीटल चालक व मेडीकल चालक हे मुदत संपलेल्या गोळ्या, औषधी, हॅन्डगोल्ज, इजेक्शन असे रस्त्यावर कुठेही फेकत आहेत. हा सर्व प्रकार तेव्हा लक्षात आला जेव्हा मनीष नरवडे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडी हे या ठिकाणावरून जात होते. त्यांनी या संदर्भात माहीती कळवली आहे.

बायोवेस्ट मेडीकल हे छावणी मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणावर पडलेले होते. या परिसरात जणावराचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. जनावरांच्या खाण्यात जर बायोवेस्ट मेडीकल व औषधी इजेक्शन आले तर जनावराची जिवित हानी होऊ शकते, असे प्रकार जर औरंगाबाद शहरात दाट रहदारीच्या ठिकाणी होत असेल तर महानगरपालिका आरोग्य विभाग या प्रकाराकडे कधी गांभीर्याने बघणार आहे. असा प्रश्न सर्व सामान्यांना पडलाय. हे बायोवेस्ट मेडीकल फेकणा-यावरती गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनीष नरवडे यांनी केली आहे. 


मनीष नरवडे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडी औरंगाबाद