तालुक्यात आढळले आज ४ पॉझिटिव्ह रुग्ण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.११) : मागील काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली आहे. शाराबरोबरच ग्रामीण भागातही नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याकरिता प्रशासनाने घेतलेले परिश्रम फळाला आले आहेत. प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजना व आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचार प्रणालीमुळे रुग्णसंख्येत बरीच घट झाली आहे. नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तालुक्यात आज ४ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन २३ वर आली आहे. 
तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग मंदावल्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती अगदीच नियंत्रणात आली आहे. आज ७८ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये ३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज करण्यात आलेल्या ४५ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये केवळ एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. आता मात्र ४५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. २३ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३ रुग्ण कोविड केयर सेंटला तर १५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहे. तर ५ रुग्ण यवतमाळ व इतरत्र भरती आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले चारही रुग्ण शहरातीलच असून त्यामध्ये प्रगतीनगर येथील दोन तर कणकवाडी व शेतकरी मंदिर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.