सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (ता.२१) : चंद्रपूर येथील भगवान बीरसा मुंडा ह्यांची प्रतिमा नगर पालिकेनि हटवून आज चार महीने झाले, तेव्हा पासून आज पर्यंत त्या जागेवर आदिवासी समाजाचे धरणे आंदोलन सुरू आहे, प्रशासन व लोक प्रतिनिधी ह्याच्या सोबत अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. प्रशासनाने एका महिन्यात होत्या त्या ठिकाणी पुतळा बसवून देऊ अशी ग्वाही, माजी पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महानगर पालिका आयुक्त, व समाजाचे शिष्ट मंडळ ह्यांच्या बैठकीत दिली. पण तीन महिने झाले तरी अजून पर्यंत पुतळा बसविण्याचे काम सुरू झाले नाही, किवा कागद पत्रे नमस्कार तैयार केली नाही. त्या मुळे आदिवासी समाजाचे श्री.अशोकजी तुमराम ह्यांनी आमरण उपोषणास बसण्याचा धोका पत्करला, तरी प्रशासन गांभीर्याने दखल घेत जात नाही.
आज आदिवासी समाजाचे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. शेकडोंच्या संख्येने आदिवासी समाज आंदोलनाच्या ठिकाणी येऊन प्रशासनाला दाखवून दिले की,ह्या समोर ह्या पेक्षा उग्र, व मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देऊन करण्यात आला.
जो पर्यन्त पुतळा नियोजित ठिकाणी बसत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचे प्रण अशोक तुमराम ह्यानी केले आहे.
होणारे आंदोलन इतर राजकिय पक्ष, आदिवासी विविध संघटनांनी मिळून करू असे, आज विविध संघटनेच्या प्रतिनिधी ह्यानी आज आंदोलन स्थळी बोलून दाखविले.