टॉप बातम्या

शहीद बाबुराव शेडमाके यांचा त्याग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी! आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे प्रतिपादन

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

चंद्रपूर : ब्रिटिशांविरुद्ध लढा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आदिवासींच्या हक्कांसाठी बलिदान देणारे क्रांतीवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांचे शौर्य व त्याग समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी केले.
क्रांतीवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके स्मारक समिती व आदिवासी कृती समिती, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रद्धांजली व प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
क्रांतीवीरांचा इतिहास आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवून समाजात जागृती निर्माण करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. मेळाव्याला आदिवासी समाजबांधव, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्याच्या विविध भागांतून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक वेशभूषा मध्ये चंद्रपूर शहरात दाखल झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून जयघोष करत भव्य रॅली काढण्यात आली. उत्स्फूर्त सहभाग आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीनंतर सर्वजण कार्यक्रमस्थळी दाखल झाले. आदिवासी बांधवांची मोठी उपस्थिती आणि उत्साहपूर्ण वातावरणाने या कार्यक्रमाने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();