टॉप बातम्या

महात्मा रावण हे अनार्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व - ॲड. प्रमोद घोडाम


सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

यवतमाळ : न्यायप्रिय, महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारश्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे.ते महान दार्शनिक, संगीत तज्ञ, राजनितिज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट रचनाकार, समताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उद्गगाता असून अनार्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व आहे.असे स्पष्ट प्रतिपादन प्रमुख वक्ते, ट्रायबल फोरमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी केले.

ते जंगोदाई तुंगार गोंगो महोत्सव समिती वाघापूर यांच्या वतीने भिमालपेन पेनठाना येथे घेण्यात आलेल्या महात्मा राजा रावण महापूजा ( गोंगो ) कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश कन्नाके, प्रमुख पाहुणे म्हणून कोया पुणेम गोटूल समितीचे राज्याध्यक्ष प्रल्हाद सिडाम, ज्येष्ठ साहित्यिक बाळकृष्ण गेडाम, कोलाम संघटनेचे लक्ष्मण भिवणकर, उलगुलान संघटनेचे राजू चांदेकर, सुधाकर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे प्रमोद घोडाम म्हणाले की,महात्मा राजा रावणाची देशातील सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे १५ मीटर उंचीची आहे. तामिळनाडू मध्ये ३५२ मंदिरे आहेत. छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, बिहार, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रात महात्मा रावणाची मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजबांधव पूजा करतात.

सुरुवातीला जंगोदाई नवरात्र गोंगो सुरेश चिंचोळकर कुटुंबाच्या हस्ते झाली.भुमक वीरसेन मडावी होते. नंतर महात्मा राजा रावण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर गोंडी सप्तरंग ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जंगोदाई तुंगान गोंगो नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेश मडावी, भिमालपेन पेनठाणा वाघापूरच्या सचिव निकिता उईके, नरेश उईके, अजय उईके कैलास टेकाम, गुलाब घोडाम, मधुकर मडावी‌, गजानन कोटनाके, विनोद उईके‌‌, प्रा. गजानन कोवे‌‌, प्रा. किरण अनाके तथा बहुसंख्येने आदीवासी समाज उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर उईके, तर आभार विनोद मडावी यांनी मानले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();