चंद्रपूर | किरण घाटे
अमरावती : होमगार्ड गृहरक्षक दल मध्ये कार्यरत असताना उल्लेखनीय व अतुलनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक पुरस्काराचे मानकरी ठरलेले होमगार्ड केंद्र नायक रामजी बाळकृष्ण पिंजरकर यांचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती सोहळा पार पडला.
विदर्भातील अमरावती मुक्कामी पार पडलेल्या ह्या भव्य दिव्य नेत्रदीपक सेवानिवृत्ती सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका तथा चंद्रपूरच्या सुपरिचित कवयित्री विद्या पिंजरकर ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.
प्रशासनात व जनतेत रामजी पिंजरकर यांची एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्वत्र ओळख होती.अनेकांनी या कार्यक्रमात बोलताना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख केला.
दरम्यान ह्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर जातीने उपस्थित होते.
उपस्थितीतांच्या सदैव स्मरणात राहावा असा हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.याच वेळी रामपर्व गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे राष्ट्रपती पदक पुरस्काराचे मानकरी ठरलेले रामजी पिंजरकर हे विदर्भातील सुपरिचित जेष्ठ कवयित्री विद्या पिंजरकर यांचे दिर होतं.
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या वतीने नवोदित कवयित्री प्रियंका बेन्द्रे यांनी या समारंभाला उपस्थित राहून सेवानिवृत्त रामजी पिंजरकर यांना पुष्पगुच्छ देत त्यांना मनापासून शुभेच्छा व शुभकामना दिल्या. कार्यक्रमाला पिंजरकर कुटूंबातील सर्व सदस्यगण व मित्रमंडळी मोठ्या संख्येंने उपस्थित होती.