सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील महागाव येथे अविनाश लांबट यांच्या सुबक संकल्पनेतून लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या उपक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त साथ देत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
यावेळी तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, तालुका कृषी अधिकारी खवले मॅडम, सहायक गटविकास अधिकारी राठोड, मंडळ अधिकारी कांडारकर, तलाठी मडावी आणि ग्रामसेवक बांगडे उपस्थित होते.
उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जलसंधारणाचे महत्त्व, पावसाचे पाणी अडविण्याची गरज आणि त्यातून होणाऱ्या संभाव्य लाभांबाबत मार्गदर्शन केले. गावाच्या विकासासाठी शासनाच्या योजनांना लोकसहभागाची जोड मिळणे आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
पाणी अडवून जमिनीत जिरविण्याच्या माध्यमातून भूजल पातळी वाढविणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्याच्या दृष्टीने वनराई बंधाऱ्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.यावेळी गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

