सह्याद्री चौफेर | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूरची उदयोन्मुख क्रिकेटपटू कु. आर्या प्रकाश सुर्वे हिची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील (अंडर-१९) क्रिकेट संघात निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे चंद्रपूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे यांची कन्या असलेल्या आर्याने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या निवडीबद्दल महाराष्ट्रातील नामवंत 'सहज सुचलं' मित्र परिवाराच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी आनंद व्यक्त करत, आर्याचे यश सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षिका ॲड. मेघा धोटे, कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते, योगशिक्षिका रंजु दिलीप मोडके, नलिनी आडपवार, आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे, विद्या पिंजरकर, पुरुषोत्तम कोमलवार, राजेंद्र पचारे, दत्तात्रय समर्थ, चैताली आतराम, चंदा कामडी, विजया भांगे, विजया तत्वादी, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर, प्रियंका बेंन्द्रे, ज्योती घाटे, प्रियंका चिताडे, ॲड. अंजली गुंडावार, मंगल मिसाळ, सविता कांबळे, रोहिणी पराडकर, कल्पना मांदाडे, स्नेहा मडावी, किरण साळवी, प्रा. वैशाली राऊत, प्रा. राजश्री पाटील, प्रा. सुनंदा पाटील, कल्पना बनकर, नयना झाडे, कोकीळा पोटदुखे, मिनाक्षी गुजरकर, कविता जुमडे, संजीवनी धांडे, पत्रकार शुभम गजभिये, सुनील रामटेके, राजेश येसेकर, अभियंता किशोर निखार, नितीन लोणारे यांच्यासह सहज सुचलं मित्र परिवारातील अनेक सदस्यांनी आर्याचे अभिनंदन केले आहे. तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.