टॉप बातम्या

कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक? मारेगाव पोलिसांची धडक कारवाई; दोन बैलांची सुटका

संग्रहीत छायाचित्र 

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या संशयावरून मारेगाव पोलिसांनी वेगाव परिसरात कारवाई करत दोन बैलांची सुटका केली. या कारवाईत जनावरांसह महिंद्रा विरो वाहन असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पोलिसांना १० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास वेगाव परिसरातून जनावरांची संशयास्पद वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथकाने तत्काळ वेगावच्या दिशेने रवाना होत परिसरात पाहणी केली. त्यावेळी वेगावजवळील रस्त्यावर महिंद्रा विरो (एमएच २९ सीएम ०९८०) हे वाहन संशयास्पद स्थितीत आढळून आले.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन बैल आढळून आले. जनावरांची वाहतूक कत्तलीच्या उद्देशाने केली जात असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी दोन्ही बैलांची सुटका करून वाहन ताब्यात घेतले. वाहनाची अंदाजे किंमत पाच लाख रुपये असून जनावरांसह एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी साहिल विनोद उपासे (२१), रा. वांजरी, ता. वणी, रोशन देठे (२७), जगदीश काकडे (३०), रा. बोर्डा आणि गणेश टेमुर्डे (१८), रा. पठारपूर यांच्याविरुद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस पथकाने केली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();