टॉप बातम्या

शेतकरी–कामगारांच्या हक्कांसाठी आज वणीत महामेळावा; बच्चू कडूंची उपस्थिती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शेतकरी, कामगार, बेरोजगारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच पुनर्वसनाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज, ११ ऑगस्ट २०२६ रोजी वणी येथील शेतकरी मंदिरात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला विधान परिषद आमदार तथा शिवसेनेचे नेते बच्चू कडू प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी व कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर या मेळाव्यात चर्चा होऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विशेषतः प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, पुनर्वसन, रोजगार व वाढती बेरोजगारी यासह सर्वसामान्यांच्या हक्कांच्या मुद्द्यांवर आवाज बुलंद केला जाणार आहे.

या महामेळाव्यास शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे उपतालुकाध्यक्ष अनिल उलमाले, धीरज राजूरकर तसेच शहराध्यक्ष शिवराज पेचे यांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();