टॉप बातम्या

जागतिक आदिवासी दिना निमित्त कळंब येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

कळंब : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मददगार फाऊंडेशन व कोया पुनेम गोटुल समिती यवतमाळ, शाखा कळंब चे वतिने उत्स्फूर्त पणे वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.धनराजजी निळे पोलिस निरीक्षक कळंब व अभियंता मा. प्रशांतजी डेहनकर, पर्यावरण तज्ज्ञ ,नगर पंचायत चे उपनगराध्यक्ष मा.आकाशभाऊ कुटेमाटे, माजी नगरसेवक अज्जुभाई (अब्दुल अजीज) यांनी दिपप्रज्वलन करून जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

मददगार फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. रूस्तमजी शेख व सचिव मा. प्रशांत सोयाम यांनी मा. धनराज निळे व मा. अभियंता प्रशांत डेहनकर, उप नगराध्यक्ष मा.आकाश कुटेमाटे यांचे कुणाल जुगनाके. अध्यक्ष कोया पुनेम गोटुल समिती शाखा कळंब यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे हस्ते वड, पिंपळ, व कडुलिंब यांचे कळंब येथे जुन्या पंचायत समिती परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला कुणाल जुगनाके अध्यक्ष कोया पुनेम गोटुल समिती शाखा कळंब व सचिव सुमित सोयाम, माजी नगराध्यक्ष नामदेवराव लोणकर, ज्ञानेश्वर ढोले, मारोती जूमनाके, शामराव भलावी, प्रमोद मलये, अध्यक्ष हलबा हलबी संघटना, सचिन नाईक, विनायक गेडाम, विष्णू ऊईके , हुसेन कन्हाके, गजानन मसराम, नामदेवराव आत्राम,,सोमाजी देवतळे पुजारी, नामदेव सहारे ,शुभम ढोले, सौरव ढोले, सतिशभाऊ कडू, दत्ताजी पोफारे, हरिष भाऊ बोंदरे,सौ,चंदाताई आत्राम, योगेश कामडी,सुरज राऊत, अशोक चौधरी, महेंद्र बावणे,अजय कांबळे व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

सुत्र संचलन व आभार प्रदर्शन प्रशांत सोयाम. राज्य उपाध्यक्ष कोया पुनेम गोटुल समिती यवतमाळ. महाराष्ट्र राज्य ,यांनी केले. शेवटी सर्व सन्माननीय पदाधिकारी सदस्य व नागरिक यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();