सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच पश्चिम बंगालमधील यशाच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय साजरा केला. सोमवारी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत आनंदोत्सवात सहभागी झाले.
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई देत अभिनंदन केले, तर ‘भारत माता की जय’ आणि ‘भाजपा जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विशेष म्हणजे, ‘झालमुरी’चा आस्वाद घेत कार्यकर्त्यांनी या विजयाचा अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला.
या निमित्ताने पक्ष अधिक सक्षम करण्याचा आणि आगामी निवडणुकांसाठी जोमाने काम करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, प्रा. महादेव खाडे, बंडू चांदेकर, शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, तालुका अध्यक्ष प्रदीप जेऊरकर, नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम,सौ. मीराताई पोतराजे, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, अनिल चिंडालिया, लवलेश लाल तसेच इतर पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.