सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : २३ नोव्हेंबर १९९४ च्या नागपुर येथील विधान भवना समोरील ११४ शहीद आदिवासी गोवारी बांधवांच्या हत्याकांडापासुन गोवारी समाज भारतीय जनता पक्षा सोबत सातत्याने जुळलेला आहे.१९९५ च्या पहिल्या युती शासनाच्या स्थापनेत गोवारी समाजाचा मोठा सिंहाचा वाटा आहे.१९९५ ते २०२६ पर्यंतच्या काल खंडात भाजप सेनेचे शेकडो आमदार आदिवासी गोवारी समाजाच्या पाठिंब्याने निवडुन आले आहेत.परंतु आपल्या मताच्या भरोशावर शेकडो आमदार निवडुन सरकार स्थापनेत महत्त्वपुर्ण भुमिका घेणाऱ्या गोवारी समाजाला माञ महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासुन महाराष्ट्राच्या विधीमंडळात आमदार म्हणुन एकदाही स्थान मिळाले नाही.त्यामुळे येत्या १२ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० रिक्त जागा भरल्या जात असुन यात किमान एका जागेवर गोवारी समाजाचे प्रतिनिधी म्हणून समाजाचे लढाऊ नेते तथा भाजपा सदस्य श्री.माधवराव कोहळे यवतमाळ यांची विधान परिषदेवर आमदार म्हणुन निवड करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी सैनिक आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री.दादाराव बोटरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणविस यांच्या कडे पञाद्वारे केली आहे.
माधव कोहळे हे अनेक वर्षापासुन भारतीय जनता पार्टीत कार्यरत असुन त्यांची भुमिका आजपर्यंत पक्षासाठी महत्वपुर्ण राहीली आहे.२०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचे योगदान मोठे आहे.याच निवडणुकीत त्यांच्या पाठिंब्याने राळेगाव या अनुसुचित जमाती साठी राखीव मतदार संघात विद्यमान आदिवासी विकास मंञी ना.श्री.अशोक उईके यांचा सत्ताविसशे मताने निसटता विजय झाला.याच निवडणुक प्रचारा दरम्यान आर्णी येथील उमेदवार राजू तोडसाम यांचे प्रचार सभेत अशोक उईके यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणविस यांनी माधव कोहळे यांना सत्तेत संधी देण्याचा शब्द दिला होता.म्हणुनच आता आगामी विधानपरिषद निवडणुकीत आपण दिलेले आश्वासन पुर्ण करण्याची संधी आपल्याकडे आहे व सोबतच सर्व दृष्टीने वंचित असलेल्या परंतु विदर्भातील ११ जिल्ह्यातील ४२ मतदार संघात निर्णायक असलेल्या गोवारी समाजाला सामाजिक व राजकीय न्याय देण्याचे भुमिकेतुन समाजाचे सर्वमान्य नेते माधवराव कोहळे यांच्या रुपाने समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावे.
अशी मागणी जिल्हा भाजप नेते दादाराव बोटरे यांचे सह किसान मोर्चा जिल्हा सचिव जितेश राऊत,यवतमाळ तालुका उपाध्यक्ष भाजपा संतोष वाघाडे,भाजप यवतमाळ तालुका उपाध्यक्ष प्रविण मोगरे, घाटंजी तालुका भाजपा सरचिटणीस कमलाकर नेवारे, माधवराव नेवारे बोरगाव,वणी तालुका अध्यक्ष सुभाष लसंते,झरी तालुका अध्यक्ष सतिश दुधकोहळे, राळेगाव तालुका प्रमुख पुरुषोत्तम दुधकोहळे, गजानन ठाकरे राळेगाव,प्रशांत लसंते, नंदू नेहारे पांढरकवडा, संतोष बोटरे आर्णी,पुंडलिक फुन्ने करंजी,सिताराम मंडलवार यवतमाळ भाजपा सदस्य,विकास लसंते सालोड,राजेश नागोसे सदोबा सावळी,मनोहर अंबाडारे बाभुळगाव तालुका भाजपा सदस्य, गणपत चचाने,राजू काळसर्पे,दिनेश नागोसे,नानाजी भोयर, अशोक चायरे,विनोद ठाकरे,प्रविण बोटरे कळंब तालुका प्रमुख,मंगेश नेवारे आर्णी ,श्रीराम राऊत पांढरकवडा,शञुघन ठाकरे कुंभा इत्यादींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठवलेल्या पञातुन केली आहे.