सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लाखापूर येथे दारूच्या नशेत वादातून एका व्यक्तीवर दगडाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय आसेकर (३१) हे घरी परतल्यानंतर घरासमोर सुरू असलेला वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी अर्जुन हरोर (४३) याने शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली. यात अक्षय जखमी झाले. घटनेनंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध BNS कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत.