टॉप बातम्या

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्तीची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश देविदास लांबट यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, यवतमाळ यांना निवेदन सादर करून तातडीने वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मारेगाव तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असून येथे आदिवासी व दुर्गम भागांचा समावेश आहे. अनेक गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नसल्याने ते ग्रामीण रुग्णालयावरच अवलंबून आहेत. मात्र, सध्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होत आहे.

तसेच, मारेगाव तालुका राज्य महामार्गावर असल्यामुळे अपघातांची शक्यता अधिक असून अशा वेळी तातडीने उपचार मिळणे अत्यावश्यक असते. डॉक्टरांची अनुपस्थिती ही रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखी बाब असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ योग्य ती दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्ष व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();