सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून, याच पार्श्वभूमीवर विश्वशांती बौद्ध विहार, मनीष नगर येथे “बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार, दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून, या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक श्री. अजित खंडारे सर आणि त्यांचा संच उपस्थित राहून आपल्या सुरेल आवाजात बुद्ध आणि भीम यांच्या विचारांवर आधारित गीतांची मैफल सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रसारक मंडळ तसेच विश्वशांती बौद्ध विहार समिती, मनीष नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात बौद्ध विचारसरणी, समता आणि बंधुभाव यांचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.
या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.