सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मारेगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक व कीर्तनकार प्रमुख श्री. गंगाधर लोनसावळे महाराज, ग्रा.गी. जि.वि. परीक्षा मार्गदर्शक शंकरराव मडावी, तालुका सरचिटणीस गिरीधर राऊत, तालुका प्रचार प्रमुख राजू सिडाम, तालुका भजन प्रमुख किसन मत्ते, तालुका सेवाधिकारी सुनील देऊळकर, तालुका उपसेवाधिकारी कैलास बोंडे, तालुका संघटक बंडू सूर, तालुका कार्यकारिणी सदस्य प्रकाश उईके, तसेच प्रचारक कैलास भोयर, रमेश मिलमिले, विवेक पानघाटे, धर्मराज ढोले, विनोद भाऊ घोसले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.