सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी–वरोरा मार्गावरील झोला फाटा जवळ बुधवारी (दि. 15 एप्रिल 2026) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी फिर्यादी सुनील बाबाराव कुत्तरमारे (वय 45, व्यवसाय मिस्त्री, रा. मानकी ता. वणी, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ व त्याचा मित्र हे दोघे दुचाकी (क्र. MH29BQ9635) वरून वणीहून वरोरा दिशेने जात असताना आरोपी अमोल मलकापुरे (रा. मारेगाव) हा स्विफ्ट कार (क्र. MH14GD6835, पांढऱ्या रंगाची) भरधाव व निष्काळजीपणे चालवत येऊन दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात फिर्यादीचा भाऊ याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेची नोंद दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 4.37 वाजता करण्यात आली असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125 (अ), 125 (ब) व 106 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी अंजली चिखले (पो. स्टे. वणी) करीत आहेत.