सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील एंजल एकॅडमी वणी द्वारा वसंत जिनींगचे सभागृहात स्किन ट्रिटमेंटची भव्य मोफत कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणुन स्किन थेरेपिस्ट दिलीप वोहरा,संगीता वोहरा (पुणे) विशेषत्वाने उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन फिटनेस कोच कशीश मॅडम (वणी) यांनी केले तर अध्यक्ष व मार्गदर्शक पत्रकार सागर मुने होते.
प्रमुख अतिथी म्हणुन आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्थेची अध्यक्षा प्रिती पाटील,समाजसेविका सुचिता पाटील उपस्थित होते.
सागर मुने यांनी व्यवसाय कसा करावा, ग्राहकांना आदर द्यावा, कामाचे पैसे घ्यावे, काम करत असताना प्रामाणिक, जिद्द, मेहनत आवश्यक आहे. व्यवसाय करत असताना बाजार भावा पेक्षा कमी असू नये, स्वतःची पत निर्माण करण्यासाठी अहंकार नकॊ तरच व्यवसायात यशस्वी होता येते.
याप्रसंगी मार्गदर्शकांनी त्वचेच्या जटील समस्येवर उपचारासंबधी माहीती दिली.सोबतच पत्रकार राजुभाऊ तुरानकर यांचे नर्सरी प्लांटकडुन प्रशिक्षनार्थी मुलींना याप्रसंगी विवीध वृक्षांचे रोपवाटीका भेट देण्यात आले.
कार्यशाळेची प्रस्तावना कोमल क्षिरसागर यांनी तर संचालन नासीन शेख व जया लिकेवार हिने व आभार प्रदर्शन आफरीन शेख यांनी केले.यशस्वितेसाठी एंजल एकॅडमीच्या संचालीका नमीता पाटील व सहकारयांनी अथक प्रयत्न केले.