सह्याद्री चौफेर | चेतन पवार
दारव्हा : दारव्हा 'महा-आवास योजना' ही महाराष्ट्रातील एक सरकारी योजना आहे. ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील बेघर आणि गरजू लोकांना पक्के घर उपलब्ध करून देणे आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थींना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या महा आवास योजनेत दारव्हा तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या उपस्थितीत ७९ व्या स्वतंत्र दिनाच्या पर्वावर शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी दारव्हा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे, जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गोरेगाव ग्रामपंचायतचे सचिव अरुण जाधव आणि गोरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सुमन बळीराम माळवे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.