सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने घोषित केलेल्या ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त दि.९ ऑगस्ट ला भव्य मोटारसायकल रॅली व दि.१० ऑगस्ट ला आरोग्य शिबीर व ८०% वर विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि समाज प्रबोधन कार्यक्रम सहकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
दि.९ ऑगस्ट ला क्रांतिकारक गोंडराजे बाबुराव शेडमाके चौक चौसळा रोड वाघापूर येथुन सकाळी ९ वाजता दिलीप शेडमाके, विनोद मडावी,बाळु वट्टी व दिलीप उईके यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली काढून यवतमाळ मध्ये फिरुन राजमाता विर दुर्गावती मडावी चौक मोठे वडगाव येथे समारोप होईल.
दि.१० ऑगस्ट ला ९ ते ११ पर्यंत आरोग्य शिबीर राहणार आहे. उद्घाटक डॉ सुभाष ढोले जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे डॉ.बाबा येलके एमडी मेडिसिन विभाग प्रमुख व.ना.वै.महा.वि.यवतमाळ, डॉ.मधुकर मडावी वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र,डॉ.मोहन गेडाम तालुका वैद्यकीय अधिकारी झरीजामणी, डॉ.दिपक नैताम बाळ रोग तज्ञ,डॉ.अरविंद मडावी वैद्यकीय अधिकारी, डॉ.विषाखा गेडाम वैद्यकीय अधिकारी व.ना.वै.महा.यवत, डॉ.संगिता मडावी वैद्यकीय अधिकारी व.ना.वै.महा यवतमाळ, डॉ.किरण वेट्टी स्त्री रोग तज्ञ यवतमाळ, डॉ.अमोल वेट्टी एमडी पॅथॉलॉजी,डॉ. चित्रलेखा कुडमेथे दंत रोग तज्ञ,डॉ.सायली कन्नाके वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र झरीजामणी,डॉ.नरेश वट्टी दंतरोग तज्ञ, डॉ.आकाश कुडमेथे दंतरोग तज्ञ,डॉ.हर्षल येरकाडे नेत्ररोग तज्ञ राहणार आहे.
आरोग्य शिबीर नंतर गुणगौरव सोहळा आणि समाजीक प्रबोधन कार्यक्रम ११ वाजता होणार आहे.उद्घाटक म्हणून पालक मंत्री तथा मृदू व जलसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड अध्यक्षस्थानी गुलाबराव कुडमेथे राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन प्रमुख वक्ते प्रा डॉ सुर्या बाली मध्यप्रदेश, जिल्हाधिकारी विकास मीना व वर्षा विकास मीना भा.प्र.से राहणार आहे.
तर प्रमुख पाहुणे खासदार संजयभाऊ देशमुख,भावनाताई गवळी आमदार विधान परिषद, बाळासाहेब मांगुळकर आमदार,राजु तोडसाम आमदार, शिवाजीराव मोघे माजी सामाजिक मंत्री,वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री, मधुकर उईके केंद्रीय अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन डॉ सुभाष ढोले जिल्हा आरोग्य अधिकारी, विठ्ठलराव कुमरे तहसीलदार बुलढाणा, राजुभाऊ मडावी उपशिक्षणाधिकारी जि.प, पद्माकर मडावी गटविकास अधिकारी यवतमाळ, सुरेश कन्नाके केंद्रीय कार्याध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, मीनाक्षी वेट्टी, संचालिका विकास महामंडळ नाशिक, अशोक मंगाम संचालक आदिवासी विकास महामंडळ नाशिक, पवन कुमार आत्राम केंद्रीय सदस्य ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, एड, प्रमोद घडाम संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम, प्रल्हाद सिडाम राज्य अध्यक्ष कोया पुनेम गोटुल समिती, किशोर उईके राज्य सदस्य ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, अजय आत्राम अध्यक्ष कोया पुनेम गोंड समाज मंडळ पुणे, डॉ मधुकर मडावी जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन यवतमाळ, दिलीप शेडमाके अध्यक्ष पहांदि पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्था यवतमाळ, राजू चांदेकर अध्यक्ष उलगुलान संघटना यवतमाळ,प्रा. निनाद सुरपाम अध्यक्ष नॅशनल आदिवासी युथ असोसिएशन, प्रवीण मडावी कार्याध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, गुलाबराव मेश्राम जिल्हाध्यक्ष कोया पुनेम गोटुल समिती, सदानंद कुंमरे सेवानिवृत्त विभागीय उपनिबंधक नागपूर, राहुल खंडाते अध्यक्ष क्रांतिकारी बिरसा मुंडा बहुउद्देशीय संस्था हे राहणार आहे.
तरी समस्त आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती चे अध्यक्ष गुलाबराव कुडमेथे सचिव दिलीपराव मसराम उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संजय मडावी कोषाध्यक्ष तुषार आत्राम उपाध्यक्ष शंकर कोटनाके, विलास कन्नाके, अरविंद मडावी,योगिता मडावी, रमेश भिसनकर, निशांत सिडाम, नरेश उईके, भिमराव मरसकोल्हे, अजय घोडाम, गजानन कोटनाके, ज्ञानेश्वर उईके व प्रसिद्ध प्रमुख कृष्णा पुसनाके,भारत गेडाम यांनी केले आहे.