सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने "आपले अधिकार आपले कर्तव्य" या विषयावर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात शासकीय सेवेत नुकतेच कजु झालेल्या गुणवंत युवकांचा व युवतींचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणीचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले असुन उद्घाटक म्हणून सामाजिक विजय चोरडीया राहणार आहे.
तर विशेष अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. गणेश किंद्रे, श्री. ॲड. देविदास काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी नागरी सह पतसंस्था वणी, संजय खाडे अध्यक्ष जय जगन्नाथ क्रेडिट कोप- ऑप लि, विरेन्द्र महाजन, अध्यक्ष बार असोसिएन वणी न्यायालय, राजु धावंजेवार अध्यक्ष मानवी हक्क सुरक्षा परिषद ट्रस्ट महाराष्ट्र प्रदेश हे राहणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील टागौर चौक येथील भावसार समाज सभागृहात शनिवारी दिनांक २ ऑगस्ट ला संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला उपस्थीत राहुन सहकार्य करावे असे आवाहन मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.