Top News

सिने स्टाईलने पाठलाग आणि तस्करांची धूम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : वाळू व इतर गौण खनिजांचा अनधिकृत उपसा, वापर व वाहतूक रोखण्यासाठी मारेगावचे तहसीलदार सतत ऍक्शमोडवर असतात. ते दिवस असो की रात्र जीवाची पर्वा न नवनवीन क्लुप्त्या आखून वाळू तस्करांचे मनःसुबे हाणून पाडण्यात त्यांचा मोठा हातखंड असल्याचे सर्वश्रुत आहे. आज 27 जुलै रोजी सायंकाळी कोसारा मार्गांवर त्यांनी एका सहा चक्की ट्रक चा सिने स्टाईलने पाठलाग केला, आपल्या पथकला सोबत घेऊन स्वतः मोटारसायकल चालवत त्या वाहणाचा पाठलाग केला, मात्र ट्रक चालकाने आपल्या ट्रकचा वेग वाढवून वडकी मार्गे पळ काढला आहे. 

मारेगाव तालुक्यातील वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन वापर, वाहतूक व तस्करी, पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी व वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा बसावा यासाठी तहसीलदार उत्तम निलावाड सातत्याने प्रयत्नशील असतात. आज रविवारी सायंकाळी कोसारा खैरी मार्गांवर वाळू ची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक ला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रक चालक न थांबता सरळ धूम ठोकली, दरम्यान त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला मात्र, तो ट्रकचालक ट्रक सह पळून जाण्यात यशस्वी झाला.
Previous Post Next Post