टॉप बातम्या

इलेक्ट्रेशनची स्प्लेंडर प्लस नेली चोरून

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी शहरात छोटे मोठ्या घटना नित्याचेच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. घटनेमागे घटना अशी मालिका जणू सुरूच झालीय का? असा प्रश्न आपसूकच उपस्थित होत आहे. मागील मे महिन्यातील 28/29 या तारखेत एका गरीब होतकरू कामगाराची चाळीस हजार रूपयाची दुचाकी चोरीला गेली, अशी तक्रार काल 10 जून रोजी वणी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

वणी शहराच्या उत्तरेस 8 किमी अंतरावर असलेल्या एका नामांकित कंपनीत इलेक्ट्रेशन म्हणून काम करणाऱ्या नामे स्वप्नील अशोक टेकाम (27) रा. गणेशपूर (ता. वणी) या होतकरू तरुणाची दुचाकी चोरून नेली. वणी पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटनेत दिवासेंदिवस वाढ होत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी हा ड्युटी करिता रॉकवेल मिनर्लस कंपनी भालर रोड ता. वणी येथे गेला असता सदर स्पेलंडर प्लस क्रमांक (MH-29, BW-6382) ही मोटारसायकल कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरुन नेली असून तिची किंमत अंदाजे 40,000/- रु. ची आहे. फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा बीएन एस प्रमाणे नोंद केला असुन पुढील तपास वणी पोलीस करत आहे.






Previous Post Next Post