मारेगाव : भारतीय जनता पक्षाकडून आज नूतन तालुकाध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये मारेगाव तालुकाध्यक्ष पदी पुन्हा एकदा अविनाश लांबट यांची निवड करण्यात आली. अविनाश लांबट यांनी गेली 2 वर्षे कुशलपणे संघटना हाताळली. या कार्यकाळात नवीन जुने भेदभाव न ठेवता सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला, तसेच सर्व नेत्यांमधील दुवा बनून सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम केले. सर्वांच्या मदतीने संघटना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. अविनाश लांबट हे कुशल संघटक आहेत. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना दुसऱ्यांदा तालुका अध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. त्यांच्या वर या निवडीने सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.