Top News

वणी : अर्जणवीस संघटनेचा अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी वणी विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्यामुळे वणी विधानसभेतील नागरिकांमध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना विविध कार्यरत असलेल्या संघटना, सामाजिक संघटना पाठिंबा देण्यासाठी सरसावल्या आहेत. यात अर्जणवीस संघटना वणी च्या वतीने जन कैवारी,अपक्ष उमेदवार संजय रामचंद्र खाडे यांना पाठिंबा जाहीर देण्यात आला. 

संघटनेचे नरेंद्र नाखले, संजय कांबळे, मोहन शेंडे, युवराज चांदेकर, पांडुरंग आसुटकर, राजू शंकर शेंडे, राजू सोमकुवर, चंदन पळवेकर, राजू काकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर करण्यात आला. 

गेल्या अनेक वर्षांपासून जनहितार्थ सामाजिक कार्य करत आहोत. यावेळी जनतेकरिता ही निवडणूक लढवीत असल्याचे खाडे यांनी आपली भावना व्यक्त केली. आपण अनेकांना संधी दिली एकदा मला द्या, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान उपस्थितांनी "भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" विजयी भव... म्हणत प्रचार कार्याला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी "शिट्टी" या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन श्री.खाडे यांनी केले.

Previous Post Next Post