वणी मतदार संघातील सुशिक्षितांची वणवण भटकंती कधी थांबणार - केतन पारखी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : व्यवसायाभिमुख शिक्षण, पदवी घेऊन तसेच अन्य प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या सुशिक्षितांची वणी विधानसभा मतदार संघात काही कमी नाही. येथे नामांकित अनेक कंपन्या अस्तित्वात असून काम करण्यासाठी हवे तेवढे शिक्षण व पात्रता आज बहुसंख्य तरूणांकडे आहे. परंतू स्थानिकांना कंपनी कामावर घेण्याऐवजी स्थानिकांना डावलत परप्रांतीयांचा भरणा करीत असल्याचे आरोप होत आहे. या तालुक्यात ब्लॅक डायमंड सिटी, अशी ओळख असलेल्या वणी शहरात विराजमान विविध कंपनीकडून सुशिक्षित बेरोजगारांची उपेक्षा होत असल्याचे आरोप होत आहे. स्थानिक पात्र तरूणांना डावलण्यात येत असल्याने नाईलाजास्तव यांना रोजगारासाठी अन्यत्र भटकंती करावी लागत आहे. या कंपनीत काम मिळेल अशी आशा स्थानिकांना होती. परंतू काही मुठभर चापलूसांच्या मुलांना व नातेवाईकांना नोकरीत प्रथम प्राधान्य देऊन गरजवंत तरूणांच्या हातात लॉलिपॉप देण्याचे काम झाले व होत असल्याची संतापजनक चर्चा ऐकायला मिळत आहे. 

आजपर्यंत सगळ्याच लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. निवडणुक आली की, बेरोजगारांच्या भावनांशी खेळत मते मिळवायची आणि नंतर 'नोकरी सोडून बोला ?' असे सांगायचं, यामुळे 'सगळे एकाच माळेचे मणी' असल्याची संतप्त भावना शिक्षित बेरोजगार तरूण व्यक्त करताना आढळतात. आदिवासी, अतिदुर्गम क्षेत्रातील मारेगाव झरी तालुक्यात मोठे उद्योग अस्तित्वात नाहीत. या दृष्टिकोनातून बघितले तर येथील प्रत्येक तरूणांच्या हाताला मागेल तेवढा रोजगार उपलब्ध व्हायला हवा होता. मात्र, याठिकाणी याच्या विपरीत स्थिती आहे. वणी आसपास चा परिसरात उद्योग सुरू झाले. येथे तरी रोजगार मिळेल अशी आशा होती. मात्र, येथे वशिलेबाजीने काही मोजक्या आणि मनमर्जीतील लोकांना घेण्यात आल्याची चर्चा आहे. एक, दोन अपवाद वगळता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उभे असलेले उमेदवार रोजगार संदर्भात चकार शब्दही काढायला तयार नाही. त्यामुळे तरूणांनी कामासाठी जायचे तरी कुठे? असा प्रश्न अद्यापही कायम असून निवडणुकीपुर्ता वापर करून घेत असल्याची भावना व्यक्त होत आहेत.

'स्थानिक उपाशी, परप्रांतीय तुपाशीं
सध्या येथील रोजगार परप्रांतीयांचा हातात मोठ्या प्रमाणात असल्याने मतदार संघातील सुशिक्षित वणवण भटकत आहे. एकीकडे स्थानिक बेरोजगारीचा पारा उच्चांक गाठत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींकडून सुद्धा या तरुणांच्या पदरी निराशाच पडत आहे. निवडणूक आली की, रोजगार निर्मितीची मोठमोठी आश्वासने दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात आपले काम पूर्ण झाले की, दिलेले आश्वासन विसरतात. गेल्या अनेक दशकांपासून तरुणांची अशाच प्रकारे थट्टा, उपेक्षा सुरू आहे. यामुळे स्थानिक तरूणांना रोजगारासाठी अन्यत्र भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहेत. 'स्थानिक उपाशी, परप्रांतीय तुपाशीं असे याप्रसंगी म्हटले तर वावगे ठरणार नाही.? 

सॉफ्टवेअर अभियंता,अपक्ष उमेदवार केतन नत्थूजी पारखी (बोधचिन्ह : बॅट)
वणी मतदार संघातील सुशिक्षितांची वणवण भटकंती कधी थांबणार - केतन पारखी वणी मतदार संघातील सुशिक्षितांची वणवण भटकंती कधी थांबणार - केतन पारखी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 14, 2024 Rating: 5
Powered by Blogger.