सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : 76-विधानसभा मतदार संघातील निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी, सरकारच्या विरोधात राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या मुकाबला करण्यासाठी सी पी आयचा लढा लढण्याची क्रांती जनसंवादातून निर्माण होत असल्याचे कॉ. अनिल घनश्यामराव हेपट (बोधचिन्ह विडाओंबी) यांनी आजच्या बाईक रॅली दरम्यान आत्मविश्वातून व्यक्त केला.राजकीय पैलू आणि त्याचा परिणामावर बोलताना तीव्र कृषी संकट आणि वाढत जाणाऱ्या शेतकरी आत्महत्या, भूमींहीनता आणि जमीन धारणेच्या विषमतेत झपाट्याने वाढ, बळकावलेल्या प्रचंड जमिनीमुळे शेतकऱ्याची लागलेली विल्हेवाट, वनाधिकारावरील हल्ले आणि संसाधनाची लूट, आर्थिक उदारीकरण आणि शेतीचे कार्पोरिटीकरण, मुक्त व्यापार आणि आर्थिक उदारवादाचे आकर्षण, नोटाबंदी आणि जीएसटीचा शेतकऱ्यावर हल्ला, दुप्पट उत्पन्नऐवजी शेतकऱ्याचे दुप्पट हाल आणि वाढता कर्जबाजारीपणा, शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ शेतमालाच्या भावात सातत्याने घसरण, दुष्काळ पूर आणि सरकारी उदासीनता यामुळे होणारी मानवी शोकांतिका, मनरेगा आणि ग्रामीण रोजगारावर हल्ला, शेतीतील महिलांची वाढलेली असुरक्षितता, गुराच्या व्यापारावर निबंध घालणारी अधिसूचना, वन्य प्राणी आणि भटक्या गुराचा धोका, हवामान बदल, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर गंभीर हुकूमशाही आणि धर्मांध अल्ला, यावर रिमोट लावण्यासाठी या राजवटीचा पराभव न झाल्यास आणखी मोठे धोके समोर आहेत, व ते येथील, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, धर्माधता, जातपातवाद आणि हुकूमशाही या भयंकर संकटांचा राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या मुकाबला आणि पराभव करावा लागेल, हे आता जनमतांच्या हातात असून ही क्रांती करण्याची वेळ असून सी पी आय तो लढा लढत असून मतदात्यांनी हया क्रांतीत स्वयंपूर्ण होऊन आपल्या हक्काच्या लढाई साठी लढवैय नेतृत्व असलेल्या सीपीआयच्या लढाईचे नायक बना, संकटाचा राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या मुकाबला आणि पराभव झाला पाहिजे, यासाठी डोके हात पाय समोर करून सीपीआयला सात द्या. कॉम्रेड अनिल घनश्यामराव हेपट (बोधचिन्ह विडा ओबी) यांनी मतदात्यासी संवाद चर्चातून संवाद साधला.
हुकूमशाही चा पराभव करावा लागेल-कॉ अनिल हेपट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 14, 2024
Rating: