टॉप बातम्या

खैरगाव (भेदी) येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्याने तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्था द्वारे एक दिवसीय भव्य कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. 
उद्घाटन विजय चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर सरपंच तुळशीराम कुमरे, नीडचे अध्यक्ष तुळशीराम आत्राम, शंकर लालसरे, प्रशांत नांदे, भादीकर साहेब, पत्रकार राजू धावंजेवार, सागर मुने, प्रतिभा तातेड, यासह इतर मान्यवर उपस्थिती होती. 
यावेळी प्रेक्षणीय सामना खेळण्यात आला. खैरगाव परिसरातील 22 गावातील युवकांनी या कबड्डी सामन्यांमध्ये सहभाग नोंदवून सामान्यांचा आनंद लुटला. या सामन्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ अशा बक्षीसासह प्रत्येक सहभागी मंडळाला प्रोत्साहन पर बक्षीस आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी विजय चोरडिया यांचा वाढदिवस शेकडो युवकांनी आपुलकीने साजरा केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खैरगाव (भेदी) ग्रामवासी आणि नीड च्या सदस्यांनी मेहनत घेतली.
Previous Post Next Post