सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : आज रविवारला देशभरात अखिल भारतीय महिला काँग्रेसचा 40 वा स्थापना दिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त वणी येथेही महिला काँग्रेस तर्फे स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील वसंत जिनींग सभागृहात अखिल भारतीय महिला काँग्रेसचा वर्धापन दिन थाटात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे, तर प्रमुख पाहुणे खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, महिला जिल्हाध्यक्षा संध्या बोबडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
स्थापना दिनानिमित्ताने महिला काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांच्या आदेशानुसार आजपासून देशात महिलांकरिता ऑनलाईन नोंदणी अभियान सुरू करून 5 वर्षांसाठी सदस्यत्व देण्यात येत आहे.
महिला काँग्रेसच्या संकेतस्थळाचे रविवारी उद्घाटन करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी सांगितले. त्याचबरोबर महिला काँग्रेसकडून ऑनलाइन सदस्यत्व मोहीम सुरू आहे. पत्रकार बांधवाशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, भाजपच्या राजवटीत महिला भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगत आहेत, त्यांचे काय होईल हे त्यांना माहीत नाही. केंद्र सरकारने महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी. आज भाजपच्या राजवटीत बलात्कार, भ्रष्टाचार आणि घोटाळे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळावर चिंता व्यक्त केली.
आज अखिल भारतीय महिला काँग्रेस वर्धापन दिवस व यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी च्या जिल्हाध्यक्षा संध्या बोबडे यांचा वाढदिवस हा योग एकत्र आल्यामुळे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वर्धापन दिन साजरा करत त्यांना उत्तम आरोग्यासह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या दिनानिमित्त आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिला काँग्रेस च्या तालुका अध्यक्ष अलका महाकुलकर, शहर अध्यक्ष शामा तोटावार, शालिनी रासेकर, अरुणा खंडाळकर, निलिमा काळे, वंदना आवारी, वसंत जिनींग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे, काजल शेख, पूनम पिंपळकर, प्रियांका मडावी, दर्शना पाटील, ललिता बरशेट्टीवार, मारेगाव महिला ता. अध्यक्ष माया गाडगे, विद्या देठे, मासीरकर काकू, आदींसह असंख्य कार्यकर्त्या महिलांचा समावेश होता.