वणीत २९ ऑगस्ट रोजी विदर्भस्तरीय 'आझादी की दौड' स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विदर्भस्तरीय 'आझादी की दौड' स्पर्धेचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी सात वाजता केले आहे.

साडे चार किलोमीटर दौड असणारी ही स्पर्धा दोन गटांत होणार आहे. 'अ' गटात १० वर्षावरील ते १५ वर्षांआतील वयोगटातील मुले व मुली असे दोन विभाग आहेत. प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके, मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

'ब' गट १५ वर्षांवरील सर्वांसाठी खुला असून या गटात १५ वर्षांवरील मुले व मुली असे दोन विभाग आहेत. प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके, मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

सर्व वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र तसेच सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असून आझादी की दौड स्पर्धेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी व धावपटूंनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार आणि लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानओडे, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर आणि वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्युनिअर अॅड सिनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत गोडे, स्पर्धेचे मुख्य संयोजक व लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक प्रा. उमेश व्यास, क्रीडा शिक्षक प्रा. कमलेश बावणे, वणी लायन्स हायस्कूल येथील क्रीडा शिक्षक किरण बुजोणे, रूपेश पिंपळकर, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयातील क्रीडा शिक्षक इंदु सिंग, अनिल निमकर, दत्तात्रय मालगडे, अरविंद गारघाटे यांचेसह दोन्ही आयोजन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम करीत आहेत.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असून विदर्भातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यांतील धावपटूंनी नोंदणी केली आहे. दि.२५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू आहे.

विदर्भातील क्रीडासस्थांनी सहकार्य करावे- विजय मुकेवार

आज मैदानी खेळांचे महत्त्व सर्वांनी समजून घेतले पाहिजे. विदर्भस्तरीय 'आझदी की दौड' या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्राचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्र करीत आहोत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विदर्भातील शाळा,महाविद्यालये आणि क्रीडा संस्थांनी सहकार्य करावे, जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांनी केले.

'आझादी की दौड' स्पर्धेच्या संदर्भात आज आलेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार बोलत होते. प्रारंभी प्राचार्य प्रशांत गोडे यांनी आयोजनाची भूमिका मांडली, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी प्रास्ताविक केले, स्पर्धा संयोजक प्रा. उमेश व्यास यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. यावेळी सचिव सुभाष देशमुख सहसचिव अशोक सोनटक्के, लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य उमापती कुचनकर, अनिल जयस्वाल, कार्यकारिणी सदस्य हे प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मनोज जंत्रे यांनी केले, किरण बुजोने यांनी आभार मानले.
Previous Post Next Post