अखेर ट्रक चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर्ध्यातून केली अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : मारेगाव तहसील कार्यालय परिसरातून चोरी गेलेला ट्रक तब्बल ४५ दिवसांनंतर स्था. गुन्हा शाखा पथकाने वर्धा जिल्ह्यातून जप्त केला आहे. ट्रक चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी ट्रकच्या मालकासह चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी घटनेमध्ये वापरलेली स्विफ्ट डिझायर कार आरोपींकडून जप्त केली.

ट्रक मालक शेख रोशन शेख अब्दुल (३५), प्रणय धनराज पोहणे (२४) दोघं रा. पालोती जि. वर्धा, शेख अफरोज शेख अब्दुल (३२), पवन देवराव किनाके (२३) दोघं रा. सालोड जि. वर्धा असे अटक करण्यात आलेले आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी जप्त केलेले ट्रक क्रमांक (एमएच ३६-१६७५) किंमत अंदाजे २ लाख ५० हजार व स्विफ्ट डिझायर कार किंमत ३ लाख रु., तसेच ताब्यातील आरोपी मारेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते यांचे मार्गदर्शनात पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, निलेश निमकर, उल्हास कुरकुटे, रजनीकांत मडावी, सतिश फुके यांनी कर्तव्य बजावले.
अखेर ट्रक चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर्ध्यातून केली अटक अखेर ट्रक चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर्ध्यातून केली अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on August 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.