वणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सहात साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त 01 ऑगस्ट रोजी शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
     
"जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच कदर जनता करते. हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते" असे एक ना अनेक विचार समाजाच्या विकासात्मक व प्रगतशील मार्ग गाठण्यास जगाला प्रेरित करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज 1 ऑगस्ट 2024 ला सकाळी 9 वाजताच्या दरम्यान वणी येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे लोकशाहीर यांना मादगी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने तसेच मोची, मादगी, मादिगा, मादरू, महासंघाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 
     
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे काही प्रसंग सांगितले व मौलिक मार्गदर्शनही केले. यावेळी संस्थेचे सचिव तथा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरज चाटे, सहसचिव तथा शहर अध्यक्ष रवी कोमलवार, अरुण एनपल्लीवार, सदाशिव मंगलपवार, किशोर मंथनवार, विजय आडराने आदी समाजबांधव उपस्थित होते.
वणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सहात साजरी वणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सहात साजरी Reviewed by सह्याद्री चौफेर on August 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.