सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : सावित्रीबाई फुले गुण गौरव समिती तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे शंभराहून अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात येऊन सत्कारार्थी तसेच प्रशासनातील कर्मचारी व समाजसेवक यांनाही सन्मानित यावेळी करण्यात आला.
सन २०२३-२४ या सत्रात १० वीच्या परिक्षेत ८० टक्के व १२ वी च्या परीक्षेत ६५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, उद्घाटन वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को.ऑ.बँक संचालक विजय चोरडीया यांच्या हस्ते संपन्न झाले. उपस्थित विद्यार्थ्यांना तहसीलदार उत्तम निलावाड, गिरीश बोंन्डे नायब तहसीलदार मारेगाव, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, कृषी अधिकारी संदिप वाघमारे, सेंट्रल बँक व्यवस्थापक आरीफ शेख, मंचकावर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणुन सेवानिवृत्त दुग्ध विकास विभागचे कार्यालय अधिक्षक श्रीराम कुमरे तर, स्वागताध्यक्ष म्हणून अ.भा.सं प. सचिव सुरेश लांडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच तुळशिराम कुमरे, नगरपंचायत बांधकाम सभापती अंजुम शेख, या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थाना सत्कार करण्यात आला. तसेच आयोजीत या सन्मान सोहळ्यात वर्ष भरात उत्तम सेवा करणाऱ्या लोकसेवक व पदाधिकारी यांना सुध्दा सन्मानित करण्यात आले. यामध्ये समाजसेवक म्हणुन कोसारा येथील वृध्दाश्रमाचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, पत्रकार कुमार अमोल, तलाठी जयवंत कनाके, पोलीस पाटिल प्रेमानंद गाणार, ग्रामसेवक विलास शिवरकर, अंगणवाडी सेविका दमयंती फुलझेले, उद्योजक तथा पर्यावरण प्रेमी राजु तुरणकर,संगीत कला विशारद रविकिरण घुमे, डॉ. कवि विनोद कुमार आदे ह्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थी, पालक, तथा उपस्थीतासाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिभा तातेड समिती अध्यक्ष, सहआयोजन माणिक कांबळे पत्रकार यांनी केले. सुत्रसंचालन स्नेहलता चुंबळे,यांनी प्रास्ताविक तुळशिराम कुमरे,तर आभार प्रशांत भंडारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदेश तातेड, अविनाश किनाके, विजया दारूंडे, आनंद गव्हाणे ईत्यादीनी केले. कार्यक्रमात पालक, विद्यार्थी तथा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मारेगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ; समाजसेवकांचा गौरव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 01, 2024
Rating: