सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : नवनियुक्त वणी तालुका अध्यक्ष यांनी तालुक्यात वज्रमूठ बांधत तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या च्या संदर्भात काल बुधवार दि. 31 जुलै ला वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
सुरवातीला माजी आमदार श्री वामनराव कासावार यांचे अध्यक्षतेखाली पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला जिल्ह्यातून नेमलेले वणी ग्रामीण करीता निरीक्षक श्री. विजय पाटील, श्री. गौरीशंकर खुराणा, वणी शहर साठी श्री अरविंद वाढोनकर, श्री.महादेवराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीत सहा ठराव मंजूर करण्यात आले, त्यामध्ये 1) दि. 12 जुलै 2024 ला सरकारने विधिमंडळा समोर कॅग चा अहवाल मांडला त्यातून राज्यसरकार च्या गलथान कारभाराचे आर्थिक बेशिस्तिचे भयावहवास्तव समोर आले, त्या बाबतीत सरकारने हिशोब द्यावा. 2)तेलंगणा राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी. 3) स्व. गोपीनाथ मुंडे विमा शेतकऱ्यां प्रमाणे शेतमजुरांना लागू करावा. 4) कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे समाजकंटकाद्वारे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्षा कडून जाहीर निषेध करण्यात येत असून हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी. 5) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. 6) ग्रामीण भागातील पांदण रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावण्यात यावे. सर्व ठराव पारित करण्यात आले. तसेच तालुका अध्यक्षांनी तालुका कमिटीची कार्यकारणी घोषित करून सर्व समावेशकाना सोबत घेतले. दि. 16 जुलै ते 22 जुलै 2024 दरम्यान तालुक्यातील खेड्या-खेड्यात चालणाऱ्या "शेतकरी न्याय" यात्रे संबंधी ची माहिती देण्यात आली. तसेच अॅड. विपलव तेलतुंबडे, हरिश्चंद्र पिदूरकर यांचा पक्षात प्रवेश घेण्यात आला. दरम्यान,घेतलेल्या ठरावाच्या मागण्याचे निवेदन तहसीलदार वणी यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी जिल्ह्यातून आलेले सर्व निरीक्षक, माजी आमदार वामनराव कासावार, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, शहराध्यक्ष डॉ. लोढा, शहर कार्याध्यक्ष अशोक पांडे, डॉ. मोरेश्वर पावडे, टीकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे नरेंद्र पा. ठाकरे, विवेक मांडवकर, डॉ. भाऊराव कावडे, ओम ठाकूर, राजू कासावार, संजय खाडे, प्रशांत गोहोकार, उत्तम गेडाम, मंगल मडावी, राजेंद्र कोरडे, ता. महिला अध्यक्ष सुरेखा लोडे, शहर महिला अध्यक्ष श्यामाताई तोटावार, शालिनीताई रासेकर, ओबीसी सेलचे विकेश पानघाटे, सेवादलचे प्रमोद लोणारे, काजल शेख, नवनियुक्त सर्व पदाधिकारी, तालुक्यातील व शहरातील सर्व कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस आक्रमक,विविध मागण्या घेऊन सरकारला धरले धारेवर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 01, 2024
Rating: