शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त शामादादा कोलाम ब्रिगेड चे शिंदे सरकार कडे निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध संघटनेच्या निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असताना शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ.इंदिरा बोंदरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केळापूर तहसील कार्यालय मार्फत निवेदन सादर करून शामादादा कोलाम यांच्या नावाने आदिवासी कोलाम समाज भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार घोषित करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.

सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, शामादादा कोलाम यांनी स्वतंत्रपूर्व काळात अन्यायाच्या विरोधात लढा दिला असुन तत्कालीन कार्यकाळात अनुसूचित जाती पैकी कोलाम जातीतील लढाऊ नेतृत्व म्हणून समाज हिताचे कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने आदिवासीं कोलाम समाज भूषण पुरस्कार घोषित करून द्यावा, अशी मागणी सहित आदिवासी समाजाच्या कब्जात असलेल्या जमिनी संरक्षनाकरिता शामादादा कोलाम आदिवासी भुमिहक्क आयोग स्थापन करण्यात यावे, अश्या विविध मागण्या शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असुन शामादादा कोलाम यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समाज हिताचे कार्य करणे हीच खरी आदरांजली अर्पण होईल असे, मत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त शामादादा कोलाम ब्रिगेड चे शिंदे सरकार कडे निवेदन शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त शामादादा कोलाम ब्रिगेड चे शिंदे सरकार कडे निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on August 01, 2024 Rating: 5
Powered by Blogger.