सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चांगलीच आक्रमक झाली असून काल दि.31 जुलै रोजी विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधी साठा देखील वेळेवर उपलब्ध राहत नाही, रुग्णालयामध्ये डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाही, प्रसुती गृहाची देखील दुर्दशा झाल्याचे चित्र वणी शहरात पाहायला मिळत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अशातच वणी ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर आणि आत मध्ये कचऱ्यांचा ढिगाळा मोठ्या प्रमाणात साचला असून यामध्ये सरपटणारे प्राणी विंचू डाळ आणि साथीच्या आजाराची देखील वाढ होताना वणी शहरात दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये एखादी सरपंच झालेला पेशंट असो वा प्रसुतीकरिता गेलेली महिला तर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना चंद्रपूर रेफर करण्यात येते. मात्र, अशीच घटना घडली वणीच्या शास्त्रीनगर येथील एका परिवारा सोबत बापलेकाला सर्प दंश झाला. मात्र, उपचार न मिळाल्याने चंद्रपूर रेफर करण्यात आले अशातच त्या बालकाचा वाटेतच मृत्यू झाला.
मात्र नव्याने बांधण्यात आलेल्या ट्रामा केअर देखील शोभेची वस्तू बनल्याचे चित्र वणी शहरात दिसत आहे. मात्र,आरोग्य मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन वणीकरांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यवतमाळ युवा जिल्हा उपाध्यक्ष मोबीन शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. निवेदनावर किशोर काळे, शादाब अहमद, धनराज येसेकर, जावेद सय्यद, रितिक चांदेकर, साहिल शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वणी ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 01, 2024
Rating: