पोलिसांची रंगीत तालीम अन प्रवाश्याची उडाली दाणादाण


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : काल शनिवारी शहरातील बसस्थानकावर एक बेवारस बॅग आहे, त्यात बॉम्ब असल्याचे माहिती मिळताच वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व ठाणेदार अनिल बेहराणी आणि पोलिस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि बसस्थानकात सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

बॉम्ब असलेल्या ठिकाणी कोणतीही जिवित अथवा वित्तहानी होवु न देता बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाव्दारे संपुर्ण घटनास्थळाची घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. दरम्यान, बॉम्ब असलेल्या बॅग ला वणी बसस्थानकातील निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी नेऊन सदर बॉम्ब हा डिफ्युज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बॉम्ब डिफ्युज होणारा नसल्याने त्याचा स्फ़ोट करुन निकामी करण्यात आले. हा रहस्यमय थरार दुपारी 12 ते 1 वाजता प्रवाश्यानी अनुभवला.

त्यानंतर फॉरेन्सीक लॅबच्या मार्फत घटना स्थळावरील भौतीक पुरावे गोळा करण्यात आले. सर्व जवान, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले होते. नंतर कळलं की ही पोलिसांची रंगीत तालीम "मॉकड्रिल" होती. आणीबाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून मॉकड्रिल करण्यात आली होती. मात्र, बस स्थानकात बॉम्ब असल्याचे कळताच येथील प्रवाश्याची दाणादाण उडाली होती, बॉम्ब स्फोटच्या धास्तीने अनेकांनी बस स्थानकतून पळ काढला, आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना याची माहिती देवू लागले. या प्रकाराबाबत लोकांनाही कळताच बस स्थानकाकडे धाव घेत मॉकड्रिल मोबाईल मध्ये सेव्ह केला, या दरम्यान बस स्थानकात अफाट गर्दी उसळली होती. काल दिवस भर बॉम्ब असल्याची चर्चा रात्रीची झोप लागेपर्यंत ऐकायला मिळत होती.

सदरची रंगीत तालीम (मॉक ड्रील) डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, गणेश किंद्रे एसडी पी ओ वणी, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सारंग बोम्पीलवार, प्रमुख, दहशतवाद विरोधी शाखा, पोउपनि परांडे, बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोउपनि धवणे, प्रमुख क्यू आर टी (QRT) पथक, तसेच पोलीस निरीक्षक अनिल बेहारानी पो.स्टे वणी, स.पो.नि. वाघमारे, वाहतुक शाखा वणी, सपोनि सुरेश परसोडे अंगुलीमुद्रा, वैद्यकीय अधिकारी, अग्निशामक दल यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post