हाजी सरवर शेख गोळीबारात ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : रहमतनगर येथील बिंनबा गेट परिसरात असलेल्या शाही दरबार हॉटेलमध्ये हाजी सरवर शेख यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हाजी च्या पोटात गोळी लागली, त्यानंतर हल्लेखोरांनी हाजी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीरित्या जखमी झालेल्या हाजीला सामान्य जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, प्राथमिक उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले.

घुग्घुस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर शेख हे बिनबा गेट जवळील शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करीत असतांनाच अचानक पाच आरोपींनी हाजी सरवर यांच्यावर हल्ला केला त्यात हाजी अली गंभीर जखमी झाला, त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले, दरम्यान त्याला सामान्य जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले. प्राप्त माहितीनुसार अज्ञात आरोपीपैकी समीर व इतर 2 आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. हत्येनंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 

जुन्या वैमनश्यातून हाजी याच्यावर आरोपींनी आपल्या बंदुकीतून गोळ्यांच्या झाडल्याचे बोलल्या जातेय. हाजी याचे नुकतेच कारागृहातून सुटका झाल्याचे कळते, हाजी यांची मागील पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून अवैध कोळसा व्यापारात त्याचा फार मोठा दरारा होता. गुन्हेगारीतला बादशहा म्हणून त्याची ओळखही होती.  

Post a Comment

Previous Post Next Post