सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आगामी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भारतीय जनता पार्टीने पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता उमद्या नेतृत्वांना दालन खुले केले आहे. आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता भाजपा युवा मोर्चा च्या तालुका अध्यक्षपदी उपसरपंच सुनील हरिश्चंद्र देवाळकर (गोंडबुरांडा) यांची निवड आज पार पडलेल्या अधिवेशनात नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. ते या निवडीचे श्रेय मारेगाव भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, सरचिटणीस प्रशांत नांदे, गणेश झाडे, सुमित जुनघरी, आशिष खंडाळकर, सुजित डुकरे, गणेश खुसपुरे, चंद्रकांत धोबे सह आदिना दिले.