सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : समाजातील वाढता चंगळवाद, सोशल माध्यमे विद्यार्थ्यांच्या मनावर गंभीर परिणाम करताहेत. मात्र, यापासून दूर राहण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन त्यांना चांगल्या गोष्टींची सवय लागली पाहिजेत, यासाठी अनेकजन झटत असतील.परंतु आपल्या वणी परिसरामधील त्यातीलच एकमात्र म्हणजे संजय रामचंद्र खाडे, हे सुद्धा लोकहितासाठी झटत आहे, असं म्हणणं काही वावगं नाही. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेला आणखी चालना मिळावी,स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तयारी व अभ्यास करण्यासाठी संजय खाडेंनी वणी शहरामध्ये भव्य अशी महात्मा फुले अभ्यासिका (केंद्र) स्थापन केले. विद्यार्थी भरकटले जाऊ नये त्याकरिता मोठ पाऊल त्यांनी उचलले आहे. त्याचा भव्य उदघाटन सोहळा आपण सर्वांनी नुकताच डोळ्यात साठवला आहेत.
संजय खाडे फाउंडेशन द्वारा संचालित स्व. रामचंद्र खाडे स्मृतीशेष महात्मा फुले अभ्यासिकाचे उदघाटन सोहळा मोठ्या थाटात काल सोमवार (ता.12) ला जुन्या युनियन बँकेच्या वरती, घर संसार सेल च्या समोर जटाशंकर चौक वणी येथे दुपारी 4 वा. पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भालचंद्र चोपणे,माजी कुलगुरू रा.सं.तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर, उदघाटक खा. प्रतिभा धानोरकर खासदार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघ ह्या होत्या तर, प्रमुख पाहुणे मा. आ सुधाकर आडबाले आमदार विधानसभा परिषद, महाराष्ट्र राज्य, मा. वामनराव कासावार माजी आमदार, अॅड. देविदास काळे, अध्यक्ष रंगनाथ स्वामी नागरी सह पतसंस्था वणी, मा. नरेंद्र ठाकरे, माजी सभापती कृ.ऊ.बा. समिती मारेगाव,मा. विजय मुक्केवार अध्यक्ष शि.प्र.मं. वणी, प्रा. दिलीप मालेकर क्रीडा प्रशिक्षक युवा चेतना क्लब, वणी, अरुणाताई खंडाळकर माजी सभापती हे होते.
या प्रसंगी महात्मा फुले अभ्यासिकाचे उदघाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून संपूर्ण अभ्यासिकाची माहिती फाउंडेशन चे सर्वेसर्वा संजय खाडे यांच्या उपस्थितीत पाहणी करत जाणून घेतली. संजय खाडे फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. असेच लोकहिताचे उत्तम कार्य पुढेही घडत राहो,हिच सदिच्छा व्यक्त करत त्यांच्या या महात्मा फुले अभ्यासिकेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर व पत्रकार बांधव आणि विद्यार्थी गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.