सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार
पांढरकवडा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे नेते, खासदार राहुलजी गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर व राज्याचे माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन आर्णी - घांटजी - केळापूर विधानसभा मतदारसंघातील प्रसिद्ध विधीतज्ञ अॅड.अनिल भिमराव किनाके व अॅड.खुशाल महादेवराव शेंडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी व समाजसेवी बांधवांनी दि.२१ जुलै रविवार रोजी शहीद जिड्डेवार भवन पांढरकवडा येथे अखिल भारतीय आदीवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष-प्रवेश केला.हुकूमशहा झालेले सत्ताधीश आणि लोकशाहीवर वारंवार होत असलेला अन्याय रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला अंगीकारून पक्षात सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले,त्यावेळी अॅड अनिल कनाके,अॅड खुशाल शेंडे,अॅड अजय कोठेवार, अॅड गोपाल मोहुर्ले,अॅड वैभव गुरनुले,अॅड. गौरव ठाकरे,अॅड निकिता नैताम,अॅड. रविकांत कावडे या सर्व विधीतज्ञ मंडळींनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.याप्रसंगी अॅड.अनिल किनाके,अॅड.खुशाल शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आदिवासी काँग्रेसचे भाऊराव मरापे यांनी प्रस्तावित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष मनोज भोयर यांनी केले,तर आभार प्रदर्शन विष्णू राठोड यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी सर्व समाज संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.पार पडलेल्या पक्ष-प्रवेश सोहळ्यानिम्मित यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर,महीला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संध्याताई बोबडे,भाऊराव मरापे,विजय पाटील चालबर्डीकर,संतोष बोरले,युवा नेते जिंतेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे,शंकरअण्णा नालमवार,प्रेमराव वखरे,रामकृष्ण वांजरीकर, उत्तमराव गेडाम यांच्या सह सर्व प्रमुख पदाधिकारी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष माजी सभापती बिसनसिंग शिंदो,खरेदी विक्री विक्री संघाचे अध्यक्ष जितेंद्रसिंग कोंघारेकर,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमर पाटील,युवक काँग्रेसचे अध्यक्ष ईकराम अली,सुरेश बेतवार,मकरंद साने,प्रशांत बोंडे,प्रेम राठोड,गंगारेड्डी क्यातमवार,माजी नगराध्यक्ष मन्नुभाऊ रोडे,केवलसिंग कपूर,व वणीच्या माजी नगराध्यक्ष शालिनीताई रासेकर सह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 23, 2024
Rating: