सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पटवारी कॉलनीतील दिनानाथ नगर येथे सुभाष वासुदेव पिदूरकर (65) हे पत्नी आणि एका मुली सह राहतात. दि.4 एप्रिलला नेहमी प्रमाणे जेवण करून सर्व झोपी गेले होते, मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान घराच्या बेडरूम ला लात मारण्याचा आवाज आला. त्या आवाजाने सर्व उठले आणि घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत चार ते पाच इसमानी "हिलना नही, नही तो मार दूंगा" म्हणत धारदार शस्त्राचा धाक दाखवत कपाट आणि अंगावरील दागिने लुटले. यात अंदाजे जवळपास 8,89000/- रुपयांचा मुद्देमाल लंपास केले. घरातील मंडळी मध्यरात्रीच्या दरम्यान साखर झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. त्याअगोदर दीनानाथ नगर मधील घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी सुद्धा लांबविले असल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र, एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा धाडसी चोरीचा थरार घडल्याने पिदूरकर कुटुंबिय या घटनेने दहशतीत आले आहे.
घरात लोक असताना देखील चोरटे या पद्धतीने चोऱ्या करत असल्यामुळे दीनानाथ नगर व पटवारी कॉलनीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाने दीनानाथ नगर पटवारी कॉलनीतील घटनेचा गांभीर्य लक्षात घेत विविध टीम ला पाचारण करून तपास सुरु केला असून पोलिस प्रशासनासमोर या चोरट्यांना शोधून काढण्यासाठी फार मोठे तगडे आव्हान आहे.