Top News

इंडिया आघाडीचा उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांचा राजूर सर्कल येथील भांदेवाडा जय जगन्नाथ देवस्थान येथे नारळ फोडून प्रचारास सुरुवात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दिनांक 4 एप्रिल रोजी राजूर येथील इंटक कामगार युनियन ऑफिस मध्ये राजूर सर्कल मधील इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने आज दिनांक 5 एप्रिल रोजी भांदेवाडा येथील जय जगन्नाथ देवस्थान येथे जाऊन इंडिया आघाडीतील स्थानिक नेत्यांनी नारळ फोडून रीतसर प्रचारास सुरुवात केली. 

या वेळेस भांदेवाडा येथील काही नागरिकांशी संवाद साधण्यात आला. देशातील मूठभर भांडवलदारांना देशाची साधने अर्पण करून देशातील सार्वजनिक उद्योग भाजपचा मोदी सरकारने विकली, त्याच सोबत 19 लाख कोटी रुपयांचे भांडवलदारांचे कर्जे माफ केली, 83 टक्के बेरोजगारी वाढविली, महिलांवरील अत्याचारांना पाठीशी घातले, मणिपूर येथील आदिवासी वर होणारे अत्याचार थांबवण्यास मोदी सरकार अयशस्वी ठरले, लद्दाक येथील स्थानिक जनता संविधानाचे 6 व्या अनुसुचीची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन करीत असताना त्याला दुर्लक्ष केले, असंविधानिक निवडणूक रोख्या च्या माध्यमातून देशात बोगस लोकांना खैरात वाटून करोडो रुपयांचा निधी उकळून प्रचंड कधी नव्हे एवढा भ्रष्टाचार भाजपचा मोदी सरकारने केला आहे. भाजपने इडी, सीबीआय व आयकर ह्या स्वायत्त संस्थेचा गैरवापर करून विरोधकांना भीती दाखवून भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन भेदाभेद करून त्यांची प्रकरणे संपविली तर जे यांचा भीती पुढे मान झुकविली नाही त्यांना तुरुंगात टाकले, हे सर्व मुद्दे ह्या प्रचारात घेऊन देशात मोदी सरकारचे रूपाने असलेली हुकूमशाही संपविण्यासाठी, लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीचा प्रतिभाताई यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. 

या वेळेस काँग्रेसचे डॅनी संड्रावार, वसुंधराताई गजभिये, रमेश देवतळे, चेतन देवतळे,महादेव तेडेवार, महाकाली पामुलवार, डेव्हिड पेरकावार, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, शिवसेनेचे नितीन मिलमिले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post