सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. आज कथेचा शेवटचा दिवस होता. या कार्यक्रमाला आज (२७) ला पणन महासंघाचे संचालक तथा जय जगन्नाथ मल्टीस्टेट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, वणी चे अध्यक्ष संजय खाडे यांनी भेट देऊन कथेचे रसग्रहण केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक हनुमान देवस्थान यांच्या तर्फे संजय खाडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आयोजकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या कथेला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.