सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भारतीय जनता पार्टी (भाजपा) चा स्थापना दिन आज (6एप्रिल) मारेगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पक्षाबद्दलचा उत्साह आणि एकजूट दर्शविली.
यावेळी तालुका अध्यक्ष श्री. अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात “मी कार्यकर्ता” ही थीम प्रभावीपणे राबविण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या विचारांचा प्रसार करत एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.
तसेच तालुका अध्यक्षांनी सर्व पुढारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत पक्षवृद्धीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.



