टॉप बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात मंगळवारी एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दामले फैल येथे राहत्या घरी त्याने गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला. 

मनोज भाऊराव उंदीरवाडे (अंदाजे वय 35) असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. 23 एप्रिलला दुपारी 2 वाजताच्या सुमारास मनोज हा घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबियांना आढळून आला.

घराच्या आड्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मनोज याच्या पाठीमागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();