टॉप बातम्या

विवाहित इसमाने केली विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील प्रभाग क्रमांक 1 मधील एका विवाहिताने काल मंगळवार च्या रात्री विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

विजय नामदेव काळे (54) असे विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपवलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी अंतिम टोकाचे पाऊल उचलत मारेगाव शिवारात असलेल्या ठाकूर यांचे शेतातील विहिरीत उडी घेतली.

मंगळवारी रात्री 8 वाजताचे दरम्यान, घडलेली घटना उघडकीस आल्यावर मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरारीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. विजय यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगी व मुलगा असा बराच आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();