Page

दुर्दैवाने काँग्रेस आता जुनी काँग्रेस राहिली नाही- अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रॉरोल बॉण्ड म्हणजे एक प्रकारे हप्ते वसुलीचे काम केले आहे. ज्या प्रमाणे गल्लीतील दादा जे करतो तेच काम मोदींनी केले आहे. इलेक्ट्रॉरोल बॉण्ड (ELECTORAL BOUND) देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. काँग्रेसने, भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत अंगावर घ्यायला पाहिजे होत, काँग्रेसने डोळे उघडायला पाहिजे होते. पण दुर्दैवाने काँग्रेस आता जुनी काँग्रेस राहिली नाही. ती आता मिनती काँग्रेस झाली आहे,असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर (adv. Prakash ambedkar) यांनी केले. ते चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघांचे अधिकृत उमेदवार राजेश बेले (rajesh bele) यांच्या वणी येथील प्रचार सभेत बोलत होते. 

उमेदवार राजेश बेले यांचेसह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन सभेकरिता वंचितचे प्रदेश कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम, विदर्भ प्रदेश महासचिव बालमुकुंद घिरड, विदर्भ संयोजक रमेश गजभिये, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे, महासचिव मिलिंद पाटील, शिवदास कांबळे, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, मोहन भवरे, रवी भगत, धम्मवती वासनिक, पुष्पा शिरसाट, संघपाल कांबळे, गौतम दारुंडे, प्रतीक मुनेश्वर, राजेश तलवारे, वैशाली गायकवाड, शारदा मेश्राम, अर्चना कांबळे, अर्चना नगराळे, नुतन तेलंग, प्रणिता ठमके, आदी मान्यवर उपस्थित होते. 

ते पुढे बोलताना म्हणाले की, दहा वर्षाचा कालखंड आणि दरम्यान, झालेल्या चुकाचा प्रमुख मुद्दा केला पाहिजे होता ते आपल्याला दिसत नाही. उलट काँग्रेसने पहिल्या टप्प्यात उमेदवार जाहीर केले.त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा गोंदियातून लोकसभेला उमेदवारी दिल्या गेली. त्यांनी लढण्याची भाषा करायला पाहिजे होती त्यांनी केली नाही, निवडणुकीत मी लढू शकत नाही दुसरे कोणाला लढवा असे म्हणून त्यांनी माघार घेतली. सैन्याचा प्रमुखच लढू शकत नाही त्यावेळेस सैन्य काय लढणार, लढणारी काँग्रेस ही आता जुनी काँग्रेस राहिली नाही.

भारतीय जनता पक्षाला जो पर्यंत तुम्ही अंगावर घेऊ शकत नाही तो पर्यंत त्याला आपटू शकत नाही.

भाजपाच्या उमेदवारांनी बहीण भावाच्या नात्यात तारे तोडले ही कॅसेट गावागावात वाजवा.भाजप या पक्षाचे नाव मिटले आहे. या नावा ऐवजी आता "मोदी पार्टी" असे नवीन नाव निर्माण झाले आहे. मोदींशी थेट दोन हात केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते. त्यामुळे येत्या 19 एप्रिल ला राजेश बेले यांच्या "रोलर" चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. मोदीच्या कारस्थानाची दबाई "रोलर"ने केल्या शिवाय राहणार नाही,असेही ते म्हणाले. 

वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची वणी येथील शासकीय मैदान पाण्याच्या टॉकीजवळ गुरुवारी (ता.11 एप्रिल) रोजी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. सभेचे संचालन वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग यांनी केले. त्यानंतर उमेदवार राजेश बेले यांचे सह मंचकावर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. सभा यशस्वी करण्यासाठी किशोर मुन, राजू चापडे, विशाल कांबळे, सोनू दुर्गे, कपिल मेश्राम, ताई डोंगरे, नंदिनी ठमके, विनोद कोठार, मिलिंद नगराळे, कुंदन नगराळे, अंजू पासवान, अर्चना दुर्गे, सुनीता दुपारे, शंकर रामटेके, केतन रामटेके, विलास तेलतुंबडे, वसीम शेख, रोहित डोंगरे, दीपक राणा, आश्विन दुर्गे, राजू गजरे, अक्षय दुपारे, शिवम खोब्रागडे यांचे सह युवा व महिला आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

13-चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ अ‍ॅड. आंबेडकर यांची चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील वणी येथे पहिली सभा पार पाडली. या सभेला प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता.